The Daily Covid-19 Bulletin 16th July 2020

The Daily Covid-19 Bulletin 16th July 2020

The Daily Covid-19 Bulletin 16th July 2020

The Daily Covid Bulletin

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 16 JUL 2020 7:52PM by PIB Mumbai

(कोविड19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

आजच्या तारखेला, देशभरामध्ये कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण  3,31,146 इतके आहेत.  हे आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकतृतीयांश पेक्षा थोडे जास्त (34.18 टक्के) प्रमाण आहे. रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबांत्मक उपाययोजना, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, क्षेत्रीय नियंत्रण उपाययोजना, संपर्कात आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखणे, प्रभावी रुग्णसंख्या असलेल्या परिसरात सर्वेक्षण करणे, प्राधान्याने चाचणी, वेळेत झालेले निदान आणि रुग्ण बरे करण्यामध्ये परिणामकारक प्रयोगशालेय व्यवस्थापन यामुळे वास्तविक देशात कोविड – 19 ची रुग्णसंख्या ही मर्यादित राहिली आहे आणि व्यपस्थापन करण्यायोग्य आहे आणि रुग्णाची काळजी घेण्यातील नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळे रुग्णांची बरे होण्याची शक्यता देखील वाढली आहे.

16 july covid

राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चाचणी क्षमता वाढविली, आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ, एसएआरआय किंवा आयएलआय सारख्या रुग्णांबाबत प्राधान्याने सर्वेक्षण, आणि वृद्ध लोक आणि सहरोगी या लोकांचा शोध सुनिश्चित केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराम्ये वाढ झाली आहे.

आलेखामध्ये दाखविल्यानुसार, जून 2020 च्या मध्यापासून 50 टक्के बरे होण्याचा दर पार केल्यानंतर, रुग्णांच्या बरे होण्यात सातत्याने वाढ झालेली दिसून येते आणि सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. एकूण कोविड – 19 रुग्णांपैकी 63.25 टक्के  रुग्ण पूर्वीच बरे झाले आहेत, त्या बरोबरीने सक्रिय रुग्णांमध्ये स्थिरपणे उतार दिसतो, तो साधारणपणे जून 2020 च्या मध्यापासून 45 टक्के होता तो आतापर्यंत साधारणपणे 34.18 टक्के आहे.

The Daily Covid Bulletin-

एकूण 6,12,814 रुग्णांपैकी गेल्या 24 तासात 20,783 रुग्ण  कोविड – 19 मधून बरे झाले आहेत. कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यामधील अंतर आता 2,81,668 इतके झाले आहे.

कोविड – 19 साठी समर्पित असलेल्या रुग्णालयांपैकी दर्जा एक असलेली 1381 रुग्णालये आहेत, 3100 कोविड आरोग्य केंद्रे दर्जा दोन मध्ये कोविड साठी समर्पित आहेत, तर 10,367 कोविड आरोग्य केंद्र हे दर्जा तीनमध्ये आहेत. या दोन्हीमध्ये अतिदक्षता विभागात 46,666 खाटांची सुविधा आहे.

केंद्र आणि राज्ये यांच्या सहकार्याने केलेल्या धोरणानुसार हे देखील सुनिश्चित झाले आहे की कोविड रुग्णांच्या संख्येवर आता प्रतिबंध येत आहे. देशभरातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी 48.15 टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यात  आहेत. एकूण 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील केवळ 10 राज्यात देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 84.62 टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकार या राज्यांना बाधित व्यक्तींच्या नियंत्रण आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या बाबतीत सतत सहकार्य करीत आहे.

इतर अपडेट्स:

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30 (स्थानिक वेळ) या वेळात आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नॉर्वेचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह समारोप सत्राला देखील संबोधित करणार आहेत. वार्षिक उच्च-स्तरीय विभागामध्ये सरकार, खाजगी क्षेत्र, नागरी संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून उच्चस्तरीय प्रतिनिधींचे विविध गट सहभागी झाले आहेत. या वर्षाच्या उच्च-स्तरीय सत्राची संकल्पना आहे “कोविड-19 नंतर बहुपक्षीयवाद : 75 व्या वर्धापनदिनी आम्हाला कोणत्या प्रकारचे संयुक्त राष्ट्र आवश्यक आहे”.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह एम्स, नवी दिल्ली येथील राजकुमारी अमृत कौर बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी, एम्सचे संचालक प्रा. आर. गुलेरिया आणि एम्सचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री राज कुमारी अमृत कौर यांच्या नावावर हा बाह्य रुग्ण विभाग सुरु केल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी आनंद व्यक्त केला. कोविड-19 च्या विरोधात देशाच्या सामूहिक प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की, हळू हळू आम्ही या साथीच्या रोगा विरुद्ध सुरु केलेली लढाई जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 2 टक्क्यांहून कमी कोविड बाधित रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत.  आपले प्रयोगशाळांचे जाळे मजबूत झाले आहे; जानेवारी 2020 पासून आज आतापर्यंत प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढत आज 1234 झाली आहे. आजपर्यंत आम्ही दररोज 3.26 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी केली आहे. डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणाले की, येत्या 12 आठवड्यांत ही क्षमता दररोज 10 लाख चाचण्यांपर्यंत वाढविण्यात येईल.

जैवतंत्रज्ञान औद्योगिक संशोधन सहाय्य परिषद चालवित असलेल्या राष्ट्रीय जैवऔषधी मोहिमेच्या अंतर्गत भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा पाठिंबा असलेले लस संशोधन आता वैद्यकीय चाचण्यांपर्यंत पोहोचले आहे. ‘बीआयआरएसी’ने घोषित केले आहे की ZyCoV-D, प्लाझमिड डीएनए लसीची रचना आणि विकास, Zydusने केला आहे आणि अंशतः जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात आले आहे, भारत सरकारने आरोग्यपूर्ण विषयांमधील टप्पा I/IIच्या प्रयोगशाळेतील चाचण्या सुरू केल्या आहेत. कोविड-19ची पहिली स्वदेशी विकसित लस तयार करून ती मानवांमध्ये दिली जाईल. चाचणीच्या घेण्यात येणाऱ्या I/II टप्प्यामध्ये बहुकेंद्रित अभ्यास लसीच्या सुरक्षेचे, सहनशक्ती आणि प्रतिकारक्षमता यांचे मूल्यांकन केले जाईल. फेब्रुवारी 2020 मध्ये कोविड-19चा वेगवान लस विकास कार्यक्रम सुरू झाल्यापासून या लसीची मानवी मात्रा, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमेरिकेचे ऊर्जा सचिव डॅन ब्रॉव्हलेट यांच्यासमवेत, अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेने (USIBC) बुधवारी आयोजित केलेल्या उद्योग स्तरीय संवादाचे सह-अध्यक्षस्थान भूषविले. याव्यतिरिक्त अमेरिका-भारत धोरणात्मक ऊर्जा भागीदारी (युएसआयएसपीएस) यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या  उद्योग स्तरीय संवादाचे अध्यक्षस्थान देखील भूषविले. प्रधान म्हणाले की या आव्हानात्मक काळातही भारत आणि अमेरिका जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता आणण्यासाठी असो किंवा मग कोविड-19 संबंधीत आव्हानांवर मात करणे असो उभय देश एकत्रित सहकार्याने प्रयत्न करीत आहेत.

भारत-अमेरिका सीईओ फोरमची बैठक दि.14 जुलै 2020 रोजी ‘टेलिफॉनिक कॉन्फरन्स’च्या माध्यामातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर राॅस यांनी संयुक्तपणे भूषविले. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांनी कोविड-19 महामारीमुळे उत्पन्न झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले, याबद्दल भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, फोरमचे सह-अध्यक्ष, सदस्य यांना विशेष धन्यवाद दिले. ते म्हणाले, या महामारीमुळे औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि यासंबंधित सर्व साधनांची पुरवठा साखळी नियमित कार्यरत रहावी, यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य राखून उभय देशांचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या आरटी-पीसीआर आधारित जगातला सर्वात स्वस्त, परवडणा-या किंमतीचा कोविड-19 निदान संच- ‘कोरोशुअर’ डिजीटल माध्यमाव्दारे लाँच केला. या संचाला ‘आयसीएमआर’ आणि ‘डीसीजीआय’ यांनी मान्यता दिली आहे. याप्रसंगी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे, आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोविडचे 7,975 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 2,75,640 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 1,11,801 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या 22,959 इतकी आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दार 55.37% असून मृत्यूदर 3.96% आहे. नाशिक जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने “आरोग्य सेवा तुमच्या दारी” हा उपक्रम सुरू केला आहे. 556 पथके स्थापन करण्यात आली असून त्यांना कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

FACTCHECK

image008HOT4

The Daily Covid Bulletin-

B.Gokhale/S.Pophale/S.Tupe/P.Kor