Teaser launch of ‘Gachchi’ starring Abhay Majhajan & Priya Bapat !
अभय – प्रियाच्या डिजिटल वॉर मधून झाले ‘गच्ची’ सिनेमाचे टीझर लाँच
‘गच्ची’… म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दुख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही ‘गच्ची’ प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच ‘गच्ची’ आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून, ‘गच्ची’ चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे.
योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल, यात शंका नाही.
Gachchi Directed by Nachiket Samant and starring Priya Bapat, Abhay Mahajan Anant Jog, Asha Shelar, Mayureshwar Kale, Siddhant Samant, Swapnaneel Jaykar, Tushar Tengale
Produced by Nitin Prakash Vaidya, Vidhi Kasliwal
Co Producers Yogesh Kulkarni, Smita Vinay Ganu
Writer : Yogesh Vinayak Joshi Director of Photography : Riju Das Editor : Ninad Khanolkar
Music : Murugan Mohan Lyrics : Yogesh Vinayak Joshi Sound Designer : Manoj Mochemadkar
Art Director : Jagannath Dhondu Hatankar Costume Designer : Sachin Lovalekar VFX : Anuj Deshpande Executive Producer : Laxmikant D Kalgutkar
Marketing Consultant : Niranjan Vidyasagar Publicity Design: Chaitanya Sant (Mantra SDS) Visual Promotion : Mohasin Kazi, Sundiip Singh
Public Relations : Amruta Chhaya Mane (Avadumber Entertainments) Social Media : Vizual Junkies.
Releases 22ND DECEMBER 2017
A NITIN VAIDYA PRODUCTIONS FILM
A LANDMARC FILMS PRESENTATION