Simmba Team on Promotion Rocks with Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi !

Simmba Team on Promotion Rocks with Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi !

Simmba Team on Promotion Rocks with Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi -

चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार ‘सिम्बा’

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ अवघ्या काही दिवसातच हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आणि त्यातील कलाकार महाराष्ट्रातील नव्हे तर परदेशातीलही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. ४०० भागांचा यशस्वीटप्पा पार पडल्यावर या चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल हे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे ज्यात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडाउचलला आहे.

मराठीच नव्हे तर आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या मंचावर हजेरी लावली. आता ‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात येणारआहे.

Simmba Team on Promotion Rocks with Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi -1

रणवीर सिंग, सारा अली खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, तसेच चित्रपटातील बाकीची कास्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सौरभगोखले आणि अशोक समर्थ हे देखील उपस्थित होते. आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरट वाडीत चेन्नई एक्सप्रेसआणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक रोहितशेट्टी यांना त्यांचं हे स्किट इतकं आवडलं की रोहितने सगळ्यांचं तोंडभरून कौतुक तर केलंच पण त्याच सोबत त्याने निलेशकडे या स्किटचे राईट्स मागितले आणि त्या स्किटवरचित्रपट बनवायला आवडेल असं हि म्हणाला.

Simmba Team on Promotion Rocks with Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi

तेव्हा सिम्बा चित्रपटाच्या टीमसोबत विनोदवीरांनी केलेली हि धमाल पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या मध्ये २४ आणि २५ डिसेंबर सोमवार व मंगळवार रात्री ९.३० वाजताफक्त आपल्या झी मराठीवर!!!