Shri Nitin Gadkari says that MSME adapt to the changes to become more efficient !

Shri Nitin Gadkari says that MSME adapt to the changes to become more efficient !

Shri Nitin Gadkari says that MSME adapt to the changes to become more efficient !

Technology is disrupting every industry including MSME and it is time that MSME adapt to the changes to become more efficient, said Shri Nitin Gadkari

Posted On: 15 NOV 2019 5:49PM by PIB Mumbai

Technology is disrupting every industry including MSME and it is time that MSME adapt to the changes to become more efficient, stated Union Minister for Road Transport & Highways and MSME, Shri Nitin Gadkari while inaugurating a one-day national conference on ‘Opportunities in Logistics, Transportation and MSME Sector’ at Symbiosis Skills and Open University (SSOU) in Pune today. The conference has been organized in collaboration with Logistics Skill Council (LSC) of India Shri Nitin Gadkari also inaugurated the J P Research Centre of Excellence for Road Safety And Accident Research. This Centre will focus on reducing fatalities in road accidents.

Shri Nitin Gadkari says that MSME adapt to the changes to become more efficient !-

Speaking on the occasion, the Minister further said, India needs skilled manpower in large numbers in the logistics, transport and MSME sectors. These sectors are extremely important to achieve the target of $5 trillion economy, he added.  He also emphasized the need for skill based education in India and how it can fuel the economic development. He lauded the efforts taken by Symbiosis Skills University in launching many useful skill based degree programs for students.

The conference was presided over by Chancellor of SSOU, Padma Bhushan Dr. S.B. Mujumdar. Director General (MCCIA), Shri. Prashant Girbane, Additional Secretary & DC (MSME) Shri. Ram Mohan Mishra, , President (MCCIA) Shri.  Pradeep Bhargava, Chairman (RGSTC) Dr. Anil Kakodkar, and Head Private Sector Development (GIZ), Noor Naqschbandi were present among the dignitaries who attended the conference.

सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या आर्थिक स्वप्नाला सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करेल

लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट आणि एमएसएमईमध्ये भारताला मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पंतप्रधानांनी ठरवलेले 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट आणि एमएसएमई क्षेत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

सिंबॉयसिस स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटी (एसएसओयू) च्या वतीने किवळे येथील विद्यापीठात आज ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई सेक्टरमधील संधी’ याविषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

तंत्रज्ञानामुळे एमएसएमईसह प्रत्येक उद्योगात प्रगती होत असून अधिक कार्यक्षम बनण्यासाठी एमएसएमईने बदल स्वीकारायला हवेत, असे गडकरी म्हणाले. भारतातील कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आणि यामुळे आर्थिक विकासाला कशी बळकटी मिळू शकते यावरही त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांसाठी अनेक उपयुक्त कौशल्य आधारित पदवी कार्यक्रम सुरू करण्यासाठी सिंबॉयोसिस स्किल विद्यापीठाने घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

सिंबॉयसिस स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. एस.बी.मुजुमदार यांनी कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीत करणारी वैकल्पिक शिक्षण प्रणाली तयार करण्याची गरज यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की कौशल्य आधारित शिक्षण ही डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेण्यासाठी काळाची गरज आहे.

विद्यापीठाच्या प्रो-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले की सिंबॉयसिस स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ आहे आणि अभ्यासक्रमामध्ये 70 टक्के भर हा कौशल्यावर केंद्रीत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या संधी समजण्यासाठी उद्योग जगतातील तज्ञांसोबत अशा परिषदांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. स्वाती यांनी नमूद केले.

यावेळी गडकरी यांनी रस्ते सुरक्षा आणि अपघात संशोधनासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या ‘जे पी रिसर्च सेंटर ऑफ एक्सलन्सचे’ देखील उद्‌घाटन केले. हे केंद्र, रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यावर भर देणार आहे.

या परिषदेत शंभरहून अधिक उद्योग तज्ज्ञ आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या क्षेत्राचा आणि बदलता दृष्टीकोनाचा आलेख समजून घेणे हा या परिषदेचा उद्देश होता. लॉजिस्टिक्स, पोर्ट मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन, टेक्नॉलॉजी या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी चर्चा केली.