Manushi Chhillar Prithviraj heroine on Earth Day advocates to try Vegetarianism !

Manushi Chhillar Prithviraj heroine on Earth Day advocates to try Vegetarianism !

Ethereally gorgeous Bollywood debutant Manushi Chhillar is celebrating Earth Day by highlighting how being a vegetarian impacts the planet in a positive way. The Prithviraj actress has been roped in by People for the Ethical Treatment of Animals (PETA) India to encourage everyone to the kerb. PETA is doing a national campaign with Manushi that shows her sporting a crown made of broccoli, asparagus, and tomatoes to drive home the message of vegetarianism.
Manushi, who won the Miss World crown for India 17 years after Priyanka Chopra won it, says, “For me, staying vegetarian was a personal choice that I made long back. I wanted to concentrate on how that impacts my overall fitness.”
She adds, “Food is a personal choice and we must eat what we feel is best for us, but my friends at PETA India and I encourage everyone to give being vegetarian a try for Earth Day and beyond if they so choose.”
According to the United Nations’ Food and Agriculture Organisation, animal agriculture – breeding, raising, and slaughtering animals for food – is responsible for about 14.5% of global greenhouse-gas emissions, which, by some estimates, is greater than all the world’s transportation systems combined.
What’s more, animal agriculture uses one-third of the world’s fresh water and one-third of global cropland for feed. Water scarcity already affects every continent – over two billion people live in countries experiencing high levels of water shortages, and more than 690 million people still go hungry.
“शाकाहारी होण्याचा एकदा प्रयत्न करून पहा, यासाठी मी सगळ्यांना प्रोत्साहन देते”, सांगतेय पृथ्वीराजची नायिका मानुषी छिल्लर
बॉलिवुडमध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेली अत्यंत देखणी मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. सगळ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने पृथ्वीराज सिनेमाच्या या नायिकेसोबत सहकार्य केले आहे. पेटा आता मानुषीसोबत एक राष्ट्रीय स्तरावरील मोहीम राबवत आहे. यात ती ब्रोकोली, अॅस्परॅगस आणि टोमॅटोंनी बनलेला मुकुट घालून शाकाहारी बनण्यासंदर्भात संदेश देणार आहे.
प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी मानुषीने भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिला. ती म्हणाली, “शाकाहारी असणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. अनेक वर्षांपूर्वी मी हा निर्णय घेतलाय. माझ्या एकूण फिटनेसवर काय परिणाम होतो, हे पहायचे होते.”
ती म्हणाली, “अन्न ही वैयक्तिक आवडनिवड आहे आणि आपल्याला स्वत:साठी काय योग्य वाटतं तेच आपण खायला हवं. पण पेटा इंडियामधील माझा मित्रपरिवार आणि मी प्रत्येकालाच यंदाच्या अर्थ डेला आणि त्यांना वाटल्यास त्यानंतरही मांसमुक्त बनण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणार आहोत.”
युनायटेड नेशन्सच्या फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मते प्राण्यांच्या शेतीचा म्हणजे आहारासाठी त्यांची वाढ, पैदास, कत्तल या प्रक्रियांचा जागतिक ग्रीन हाऊस उत्सर्जनात १४.५ टक्के वाटा आहे. जगातील सर्व वाहतूक व्यवस्था एकत्रित जितका परिणाम करते त्याहून हे अधिक आहे.
इतकेच नाही, प्राण्यांच्या शेतीसाठी जगातील एक तृतीयांश वापरण्याजोगे पाणी वापरले जाते आणि जगभरातील शेतजमिनीतील एक तृतीयांश भाग वापरला जातो. पाण्याच्या दुर्भिक्ष्याने पृथ्वीवर आताच मोठी समस्या निर्माण केली आहे. पाण्याची अत्यंत टंचाई असलेल्या देशांमध्ये दोन अब्जांहून अधिक लोक राहतात आणि 690 दशलक्ष लोक आजही उपाशी आहेत.