Announcement to create “Film World” in Maharashtra on the World Tourism Day was made !

Announcement to create “Film World” in Maharashtra on the World Tourism Day was made !

Announcement to create “Film World” in Maharashtra on the World Tourism Day was made !

filmi duniya MTDC (5)

जागतिक पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात ‘फिल्मी दुनिया’ उभारण्याची घोषणा 

filmi duniya MTDC (1)
नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व नितीन देसाई यांच्या एन.डी.आर्ट्स वर्ल्ड्सच्या सौजन्याने महाराष्ट्रात भव्य ‘फिल्मी दुनिया’ उभारली जाणार आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली हि ‘फिल्मी दुनिया’ कर्जत येथील  एन. डी. स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत, एन. डी. स्टुडियोचे नाव सोनेरी अक्षरांमध्ये कोरले जाणार आहे.
आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नांत असलेले नितीन चंद्रकांत देसाई यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात येणार असून, या ‘फिल्मी दुनिया’मधून  महाराष्ट्राला नवे प्रेक्षणीय स्थळ निर्माण करून देण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. चित्रपटातील काल्पनिक दुनियेत जिवंतपणा आणण्याची कसब त्यांच्यात असून, त्यांनी अनेक चित्रपटाद्वारे ते सिद्ध देखील केले आहे. अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट एन.डी.स्टुडियोत उभारण्यात आले असून, भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐवजच जणू ‘फिल्मी स्थान’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळणार आहे.  आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नांत असलेले नितीन चंद्रकांत देसाई यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात येणार असून, या बॉलीवूड थीम पार्कद्वारे महाराष्ट्राला नवे प्रेक्षणीय स्थळ निर्माण करून देण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. चित्रपटातील काल्पनिक दुनियेत जिवंतपणा आणण्याची कसब त्यांच्यात असून, त्यांनी अनेक चित्रपटाद्वारे ते सिद्ध देखील केले आहे. अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट एन.डी.स्टुडियोत उभारण्यात आले असून, भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐवजच जणू ‘फिल्मी स्थान’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळणार आहे.
 filmi duniya MTDC (3)
हिंदी, मराठी तसेच इतर भाषांमधील चित्रपटांचे चित्रीकरण होत असलेला हा एन. डी. स्टुडियो यानिमित्ताने प्रथमच सामान्य नागरिकांसाठी खुला केला जाणार असून, या स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात येणाऱ्या ‘फिल्मी दुनिया’ मध्ये आपल्या लाडक्या अभिनेत्याचे चित्रपट, त्याचे सुप्रसिद्ध डायलॉग्ज आणि अॅक्शन असे सारेकाही रसिकांना अगदी जवळून पाहता येणार आहे.
केवळ हिदी आणि मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास या महाफिल्मोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे. या फिल्मी दुनियेचे खास आकर्षण खालीलप्रमाणे. 
१. कृष्णधवल  ते रंगीत अशी भारतीय  चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडून येणार आहे, तसेच फिल्मी परेडचा रोमांच देखील पाहता येईल. 
२. बॉलीवूड तसेच इतर प्रादेशिक भाषेतील गाजलेल्या चित्रपटांचे रेखाटलेले  भव्यदिव्य  भित्तीचित्राचे आणि रांगोळीचे प्रदर्शन. 
3  ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच अलिशान बंगल्यात प्रेक्षकांना सफर करता येणार असून, सिनेमातील ही सारी दुनिया, त्यातील पात्र आणि बाजारपेठ वास्तव्यात अनुभवता येणार आहे.  
४. सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अैॅक्शनपटात प्रेक्षकांना सहभाग घेता येणार असून, सिनेमातील पात्रांचा पेहराव आणि मेक-अप करण्याची नामीसंधी यात मिळणार आहे. आपल्या आवडत्या सिनेमात सिनेरसिकांना केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरता येणार आहे.  
५. पडद्यामागील तांत्रिक कामांचा देखील यात समावेश असून, फिल्म मेकिंग, छायाचित्रण, संकलन अशा सर्व गोष्टींचा अनुभवदेखील घेता येणार आहे. 
६. या फिल्मोत्सवात उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून, याची दखल बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाईल. 
७. फिल्मी डान्स, सिंगिंग, कॉमेडी आणि खाओ जितो मुकद्दर का सिकंदर यांसारखे टेलेंट शो देखील होतील.   
८ फिल्मोत्सवातील  प्रत्येक सेक्शनमध्ये होणाऱ्या लाईव्ह प्रात्यक्षिकांमध्ये सिनेरसिकांना सहभागी होता येणार आहे. शिवाय खवय्यांसाठी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची चंगळदेखील असेल. त्याचप्रमाणे शॉपिंगप्रेमींसाठी मनसोक्त शॉपिंग करण्याचा एक सेक्शनदेखील उभारण्यात येणार आहे.  
2B9A0370
एव्हढेच नव्हे तर याहून अधिक आणि रोमहर्षक अशी फिल्मीजत्रा लोकांसाठी सादर करण्याचा प्रयत्न नितीन चंद्रकांत देसाई आपल्या स्टुडियोमध्ये करणार आहेत. विशेष म्हणजे आपल्या भारतात पहिल्यांदाच अश्या पद्धतीची भव्यदिव्य फिलीदुनिया उभारली जात असून, येत्या २३  डिसेंबरपासून ही दुनिया सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
या महाफिल्मोत्सवाबद्दल बोलताना, नितीन चंद्रकांत देसाई यांनी असे सांगितले की. ‘नागरिकांना सतत काहीतरी नवीन देण्याच्या मी विचारात असतो, याच विचारातून बॉलीवूड थीमपार्कची संकल्पना पुढे आली. लोकांना ही चंदेरी सिनेसृष्टी वास्तव्यात जगता येईल, असा प्रयत्न या उपक्रमाद्वारे आम्ही करीत आहोत. तसेच हे थीम पार्क तीन टप्प्यांमध्ये खुले केले जाणार आहे. सध्या नागरिकांसाठी पहिला टप्पाच खुला करण्यात येणार आहे.’ अशी माहिती ते देतात. तसेच, ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या थीमपार्कमध्ये  हॉलीवूडची दुनियादेखील वसवण्याचा माझा मानस असून, लवकरच ते पूर्णत्वास येईल’ असेदेखील नितीन चंद्रकांत देसाई यांनी पुढे सांगितले. थोडक्यात काय तर, आतापर्यत थ्रीडी आणि फोरडीचा अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांना एन. डी. स्टुडीयोत लवकरच तंत्रज्ञानाच्या आधारे नाईन डी चा थरार बसल्याठिकाणी अनुभवता येणार आहे.
NDA Studios Karjat
ट्राफिक सिग्नल चित्रपटातील रस्ता असो वा जोधा अकबर सिनेमातील राजवाडा असो, किवा प्रेम रतन धन पायो मधील डोळे दिपवणारा शिशमहल असो वा देवदास सिनेमातील भव्य हवेली असो एन. डी. स्टुडियोत हे सारे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अप्रतिम कलादिग्दर्शनाची साक्ष देतात. असा हा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा शृंगार ल्यालेला एन. डी. स्टुडियो लवकरच नितीन चंद्रकांत देसाई यांची फिल्मी दुनिया म्हणून ओळखली जाणार आहे. हि फिल्मी दुनिया सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. शिवाय मनोरंजनपर विविध कार्यक्रम देखील स्टुडियोत होणार असल्यामुळे लहानग्यांपासून ते थोरामोठ्यापर्यंत प्रत्येकाला हि फिल्मीदुनिया एका महाउत्सवाप्रमाणेच आनंद देईल, यात शंका नाही.