Ankush Choudhary wished Shivani Surve Happy Birthday with a Triple Treat !

Ankush Choudhary wished Shivani Surve Happy Birthday with a Triple Treat !

TS-SHIVANI-BD

अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील स्ट्राँग कंटेस्टंट शिवानी सुर्वेचा 28 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानीला सध्या तिचे महाराष्ट्रभरातले फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच तिच्यासाठी महाराष्ट्राच्या सुपरस्टारने दिलेल्या शुभेच्छा खूप खास आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला वाढदिवसाच्या आणि बिग बॉस मराठी सिझनची विजेती होण्यासाठी ट्रिपल शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अंकुश चौधरीसोबत शिवानी सुर्वेची येत्या 24 ऑक्टोबरला ‘ट्रिपल सीट’ ही फिल्म येत आहे. बिग बॉसमधली बॉस ब्युटी शिवानी सुर्वेसाठी ही फिल्म खूप खास आहे. शिवानी सुर्वेने बिग बॉसमध्ये एका टास्क दरम्यान सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करण्याचे आपले स्वप्न तिच्या आगामी सिनेमाव्दारे पूर्ण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सूत्रांच्या अनुसार, शिवानी सुर्वे अंकुश चौधरीची लहानपणापासून खूप मोठी चाहती आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर एकदा तरी अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करायला मिळावं, ही शिवानीची इच्छा होती. जी तिच्या ट्रिपल सीट सिनेमाव्दारे पूर्ण झालीय. शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त शिवानी-अंकुशचे पोस्टरही अनविल करण्यात आले आहे. त्यात अंकुश चौधरी ह्यांनी तिला शुभेच्छा देणं म्हणजे तिच्यासाठी नक्कीच हा दुग्धशर्करा योग असणार आहे. तिला अर्थातच ही गोष्ट बिग बॉसच्या घरात असल्याने माहित नाही आहे. पण याचा उलगडा तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर नक्कीच होईल.

ट्रिपल सीट सिनेमाचा नायक अंकुश चौधरी ह्यांनी शिवानीला शुभेच्छा देताना म्हंटलंय, ”शिवानी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील ग्रँड फिनालेसाठी तुला माझ्याकडून ट्रिपल सीट शुभेच्छा.”

शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन् साजरा करतायत तिचा आज वाढदिवस

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस मराठीत आता टॉप ६ मध्ये पोहचलेल्या शिवानीचा चाहता वर्ग अफाट आहे. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उरण, मुंबई अश्या कितीतरी ठिकाणच्या चाहत्यांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केला आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक असे सगळ्या वयोगटातले निस्वार्थ प्रेम करणारे तिचे चाहतेआहेत.

Shivani Surve - HBD

 रायगड जिल्ह्यातल्या केगाव मध्ये राहणारा शिवानीचा जबरा फॅन निनाद म्हात्रे जो गाडीवर ‘शिवानी स्टाईल’ स्टिकर लावल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने शिवानीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी परत एकदा खूप मेहनत घेतली आहे. तो राहत असलेल्या गावात कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. तरी शिवानीसाठी खास शहरात जाऊन वाढदिवसाच्या  दिवशी सकाळी निनाद केक, ग्रिटिंग कार्ड घेऊन आला. त्याने शिवानीसाठी खास पत्र लिहिलंय. वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा केल्यावर निनाद म्हणाला, “मी शिवानी सुर्वेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या प्रेमापोटीच मी माझ्यासारख्या चाहत्यांचा शिवानीयन्स हा ग्रुप बनवला आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची ट्रॉफी शिवानीनेच जिंकावी अशीआम्हा सर्व चाहत्यांची इच्छा आहे. ती बिग बॉस जिंकल्यावर तिचा ट्रॉफी हातात घेतलेला मोठा फोटो मी माझ्या घराच्या भिंतींवर लावणार आहे. तिला वाढदिवसासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हा सर्व चाहत्यांकडून शुभेच्छा.  ”

साताऱ्यात राहणाऱ्या आसावरी कर्वेने आपल्या लहान मुली आणि पतीसह थेट कास पठारावर जाऊन शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त केक कापला आहे. आसावरी म्हणाली, “ शिवानी बिग बॉसची ट्रॉफी तू जिंकून ये. तू जिंकावीस म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतेय. आम्ही सातारकर तू ट्रॉफी घेऊन येण्याची वाट पाहत आहेत. मला पूर्ण खात्री आहे कि बिग बॉसची विजेता तूच होणार आहेस.”

शिवानीने तिची छाप लहान मुलांवरही पाडली आहे.  शिवानीची सातवीत असलेली एक फॅन आहे. या छोट्या  चाहती स्वानंदी धोत्रेने आपल्या लाडक्या शिवानीताईचं खूप सुंदर पेंटिंग बनवलं आहे. स्वानंदी म्हणते, “शिवानीताई खूप स्ट्राँग आहे. मी पण तिच्यासारखी स्ट्राँग होणार. मला ती खूप आवडते. ती सगळे टास्क जबरदस्त खेळते. बिग बॉसची ट्रॉफी शिवानीताईच जिंकेल, असा मला विश्वास आहे.”

स्वप्निल सोनावणे ह्या शिवानीच्या चाहत्याने वाढदिवसानिमित्त तिचं पोर्ट्रेट फ्रेम केलेलं आहे. हि फ्रेम त्याने शिवानीच्या आईला घरी जाऊन दिली असल्याचे सांगताना तो म्हणाला, की, “शिवानीला मी कायम सपोर्ट करतो. ती खूप छान खेळते. माझी फेवरेट स्पर्धक आहे. बिग बॉसची ट्रॉफी तिनेच जिंकायला हवी.”

सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो, “ शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला अनवाणी जाणार आहे तसेच दर शुक्रवारी उपवास देखील करणार आहे.”