ANAAN TEASER AND MUSIC LAUNCH

ANAAN TEASER AND MUSIC LAUNCH

IMG_2579

कलेचा अनमोल नजराणा अनान‘ – चित्रपटाचे म्युजिक आणि टीजर लाँच

प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या ‘अनान’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आले. ‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते तर इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून ह्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

Teaser-Poster-ANAAN-Marathi-Movie-social

‘अनान’ चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टिझर नुकताच लॉंच झालेला असून या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने  मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ – दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या ‘गंधी सुगंधी’, ‘एक सूर्य तू’, ‘काहे तू प्रित जगायी’  यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना जेव्हा सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांसारख्या स्वराधीपतींच्या मधुर स्वरांनी साद घातला जातो तेव्हा मैफिलीला रंग तर चढणारचं ना!

IMG_2584

या सूरांनी सजलेल्या मैफलीत ‘अनान’ चित्रपटातील एकूण 5 गाण्यांपैकी 3 गाणी लाँच करण्यात आली. ही पाच ही गाणी दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत.

लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील विविध रागांनी आणि स्वरांनी सजलेल्या

या स्वरमधुर मैफिलीचा आस्वाद तुम्हीही घ्या.

http://