The Daily Covid Bulletin from PIB dated 1st July 2021

The Daily Covid Bulletin from PIB dated 1st July 2021

The Daily Covid Bulletin from PIB dated 1st July 2021

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 01 JUL 2021 8:12PM by PIB Mumbai
  • 33.57 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India reports 48,786 new cases in last 24 hours
  • India’s Active Caseload declines to 5,23,257
  • Active cases constitute 1.72% of total cases
  • 2,94,88,918 Total Recoveries across the country so far
  • 61,588 patients recovered during last 24 hours
  • Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 49th consecutive day
  • Recovery Rate increases to 96.97%
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.64%
  • Daily positivity rate at 2.54%, less than 5% for 24 consecutive days

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

नवी दिल्‍ली/मुंबई, 1 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर समुदायाला आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. बीसी रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा होत असलेला  आजचा दिवस आपल्या वैद्यकीय समुदायाच्या उच्च आदर्शांचे प्रतिक आहे, असे ते म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड19 घडामोडींवरील माहिती

देशातील लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येत वाढ होऊन ती काल 33 कोटी 57 लाखांवर पोहोचली. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 44,75,791 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 33,57,16,019 मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत, लसीच्या 27,60,345  मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. केंद्र सरकार, देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग तसेच व्याप्तीचा विस्तार वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.

देशात, गेल्या 24 तासांत, 48,786 नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. गेले 4 दिवस सलग, नव्या कोविड बाधितांची संख्या रोज 50 हजारांहून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत देखील सतत घसरण होत आहे. भारतातील आजची सक्रीय रुग्णसंख्या 5,23,257 इतकी आहे. गेल्या 24 तासांत, एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 13,807 ने कमी झाली आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण भारतातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.72% इतके आहे.

अधिकाधिक व्यक्ती कोविड-19 संसर्गातून मुक्त होत असल्यामुळे, देशात  आता एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 49 व्या दिवशी दैनंदिन स्तरावरील नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या 24 तासांत 61,588 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले. एका दिवसात नव्याने बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत, गेल्या 24 तासांत, 12 हजाराहून जास्त (12,802)  व्यक्ती कोविडमुक्त झाल्या आहेत. महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड बाधित झालेल्यांपैकी 2,94,88,918 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 61,588 कोरोना रुग्ण बरे झाले. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 96.97% झाला असून या दराचा सतत चढता कल दिसून येतो आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 19,21,450 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 41 कोटी 20 लाखांहून अधिक (41,20,21,494) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच, दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरातही सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.64% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.54% इतका आहे. सलग 24 व्या दिवशी हा दर 5% हून  कमी राहिला आहे.

इतर अपडेट्स :

महाराष्‍ट्र अपडेट :

महाराष्ट्रात बुधवारी कोविड-19 चे 9,771 नवीन रुग्ण आढळून आले असून,बाधितांची एकूण संख्या  60,61,404 झाली आहे, तर 141 रूग्णांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,21,945 वर गेला आहे.  गेल्या 24 तासांत 10,353 रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 58,19,901 वर पोहचली आहे. राज्यात आता कोविड-19 चे 1,16,364 उपचाराधीन रुग्ण आहेत.

गोवा अपडेट :

गोव्यात बुधवारी कोरोना विषाणू बाधितांची संख्या 240 ने वाढून 1,66,689 वर गेली आहे. तर  201 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 3,054 वर पोहचली आहे. मंगळवारी संध्याकाळपासून गेल्या 24 तासांत रुग्णालयातून 201 रूग्णांना घरी सोडल्यानंतर बरे झालेल्या  रूग्णांची संख्या 1,61,361  झाली आहे. गोव्यात आता 2,274 उपचाराधीन  रुग्ण आहेत.

Important Tweets

Our strides in technology have helped us during the time of COVID-19. pic.twitter.com/mQNBHoFGPs

— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2021

An important Cabinet decision that will provide additional financial support to key projects relating to various sectors particularly healthcare and medical infrastructure. https://t.co/XE2dwhYg5K

— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2021

I’m seeing irresponsible statements from various leaders regarding #LargestVaccineDrive

Stating facts below so people can judge intentions of these leaders

?After GoI provided 75% of vaccines available for free, vaccination speed picked up & 11.50 cr doses were given in June

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) July 1, 2021

Watch Now!

Union Minister Dr Harsh Vardhan participates in @WHO virtual Information session on #COVID19@MoHFW_INDIA @WHOSEARO https://t.co/w4BNXdYxYn

— DrHarshVardhanOffice (@DrHVoffice) July 1, 2021

3 days at the #G20 Foreign & Development Ministers Meeting.
Addressed the sessions on:
•Multilateralism & Governance
•Africa
•Food security
•Humanitarian Logistics

Bilateral meetings with 14 Ministers and 5 Heads of International Organisations. pic.twitter.com/ewcfSnu4jv

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 1, 2021

#CoronaVirusUpdates:

State-wise details of Total Confirmed #COVID19 cases (till 01st July, 2021, 8 AM)

➡️States with 1-100000 confirmed cases
➡️States with 100001-800000 confirmed cases
➡️States with 800000+ confirmed cases
➡️Total no. of confirmed cases so far#StaySafe pic.twitter.com/dnMh5PkIF9

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 1, 2021

#IndiaFightsCorona:

?#?????19 ??????? ?????: ???-???? ???????????? (As on July 01st, 2021, till 09:00 AM)

✅ Above 60 years: 28.2%
✅ 45-60 years: 34.9%
✅ 18-44 years: 36.8%#We4Vaccine#LargestVaccinationDrive#Unite2FightCorona pic.twitter.com/C7eqF19EYO

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 1, 2021

#CoronaVirusUpdates:

?Total #COVID19 Cases in India (as on July 01st, 2021)

▶96.97% Cured/Discharged/Migrated (2,94,88,918)
▶1.72% Active cases (5,23,257)
▶1.31% Deaths (3,99,459)

Total COVID-19 confirmed cases = Cured/Discharged/Migrated+Active cases+Deaths#StaySafe pic.twitter.com/wS8XJMGNPM

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 1, 2021

#IndiaFightsCorona:

?#COVID19 UPDATE (As on 01st July, 2021)

✅48,786 daily new cases in last 24 hours

✅Daily positivity rate at 2.54%, less than 5% for 24 consecutive days#Unite2FightCorona #StaySafe

1/4 pic.twitter.com/MiE9QCPEg7

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 1, 2021

M.Chopade/D.Rane