The Daily Covid-19 Bulletin from PIB Mumbai

The Daily Covid-19 Bulletin from PIB Mumbai

The Daily Covid-19 Bulletin from PIB Mumbai 

PIB Fact Check=

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

The Daily Covid Bulletin from PIB Mumbai

Posted On: 29 MAY 2020 8:35PM by PIB Mumbai

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

The Daily Covid Bulletin from PIB Mumbai -

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची संख्या 89,987 आहे. आतापर्यंत एकूण 71,105 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3,414 रूग्ण बरे झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 42.89 % झाला आहे.

इतर अपडेट्स:

  • पेशीकामय अणि आण्विक जीवशास्त्र केंद्राने (सीसीएमबी) रूग्णांच्या नमुन्यांमधून कोरोना विषाणूचे (सार्स-कोव्ह -२) स्थिर संवर्धन केले आहे. सीसीएमबीमधील विषाणूशास्त्रज्ञांनी कित्येक पृथक्करणातून संक्रामक विषाणू वेगळे केले आहेत. प्रयोगशाळेत विषाणूचे संवर्धन करण्याची क्षमता ही सीसीएमबीला लस विकासासाठी आणि कोविड -19शी लढण्यासाठी संभाव्य औषधांच्या चाचणीच्या दिशेने कार्य करण्यास सक्षम करते.
  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या टाळेबंदीच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशाने कोविड-19 महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या क्षमता कशा वाढवता येतील, याचा विचार करून, कार्यवाही केली.
  • स्थलांतरित नागरिक आपल्या घरी परत जाऊ शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे संपूर्ण देशभर दररोज श्रमिक विशेष गाड्या चालवित आहे.  असे निदर्शनास आले आहे की, आधीच आजारांनी ग्रस्त असलेले लोक देखील या सेवेचा लाभ घेत आहेत ज्यामुळे कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. आधीच आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचा या प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना देखील घडत आहेत.
  • भारतीय रेल्वेने 12.05.2020 पासून सुरु असलेल्या राजधानी श्रेणीच्या 30 विशेष गाड्या आणि 01.06.2020 पासून सुरु होणाऱ्या 200 विशेष मेल एक्सप्रेस गाड्यांसाठीच्या (एकूण 230 गाड्या) निर्देशांमध्ये सुधारणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व विशेष गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 30 दिवसांवरून वाढवून 120  दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व 230 गाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाच्या आरक्षणाची परवानगी असेल.
  • 29 एप्रिल 2020.रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सीमांकन आयोगाची 28 मे 2020 रोजी बैठक झाली.तत्पूर्वी कोविड 19 महामारीमुळे सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे पहिल्या बैठकीच्या आयोजनाला थोडा विलंब झाला होता.
  • कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून सरकारने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्व मंत्रालयांच्या संबंधित सचिवांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाविषयी निर्णय घेण्यात आला.
  • कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लसींची निर्मिती, औषधांचा शोध, निदान आणि चाचणी यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल आणि भारत सरकारचे प्रधान शास्त्रीय सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. लसींची निर्मिती ही प्रक्रिया साधारणपणे धीमी आणि अनिश्चिततांचे सावट असलेली असते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
  • जेव्हा आपण अंशतः आणि शेवटी पूर्ण लॉकडाऊन उठवणार आहोत, त्याआधीच “नवीन सामान्य” जीवन कसे असेल याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, विशेषत: डॉकयार्ड्स आणि इतर नौदल प्रतिष्ठानांसारख्या मोठ्या उत्पादन संस्था जिथे लॉकडाऊन उठल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार पुन्हा कामावर रुजू होतील आणि ही संख्या हळूहळू वाढेल अशी अपेक्षा आहे. यामुळे कामगारांचे कव्हरऑल, उपकरणे, वैयक्तिक साधने (गॅझेट्स)  आणि मास्क यांच्या स्वच्छतेची जोरदार गरज निर्माण झाली आहे. ही उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी नौदल डॉकयार्ड (मुंबई) यांनी एक अतिनील स्वच्छता बे (UV sanitisation bay) तयार केले आहे.
  • लॉक डाऊनच्या काळात एफसीआयच्या भूमिकेची पासवान यांनी प्रशंसा केली आणि अन्न धान्याची ने-आण सर्वात जास्त राहिल्याचे सांगितले.या जागतिक महामारीच्या संकटाच्या  काळात एफसीआयचे कर्मचारी अन्नधान्य योद्धे म्हणून  पुढे आल्याचे आणि या आव्हानाचे त्यांनी संधीत रुपांतर केल्याचे  सांगितले.लॉक डाऊनच्या काळात  एफसीआयने अन्न धान्याची विक्रमी चढ-उतार आणि वाहतूक केली. दुसरीकडे खरेदीही अडथळ्या विना सुरळीत सुरु राहिली,या वर्षी सरकारी एजन्सीकडून गेल्या वर्षीपेक्षा जास्त गहू खरेदी झाली.या वेळी मंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अन्न धान्य वितरणाचाही आढावा घेतला.
  • निर्यातदारांनी अधिक स्पर्धात्मक बनून जगाला दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचे पियुष गोयल यांचे आवाहन : आत्मनिर्भर भारत हे केवळ मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होण्यापर्यंत मर्यादित नसून आपल्या सामर्थ्याने जगाशी नेहमी निगडीत राहणे हे आहे आत्मनिर्भर

महाराष्ट्र अपडेट्स

2,598 नवीन केसेस नोंद झाल्याने राज्यातील कोविड-19 रुग्ण संख्या 59,546 झाली आहे. 85 मृत्युंसह (ज्यातील 38 मुंबईमध्ये) राज्याची मृत्युसंख्या 1,982 झाली आहे. आपापल्या जिल्ह्यांमध्ये नागरिक परतू लागल्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि नांदेड इथून नवीन केसेस नोंद झाल्या आहेत.

PIB FACT CHECK

unnamed

The Daily Covid Bulletin from PIB Mumbai -1

RT/MC/PK