16th edition of Mumbai International Film Festival to be inaugurated at Nehru Centre Auditorium, Worli tomorrow
Dr. V Shantaram Lifetime Achievement Award to be presented at MIFF opening ceremony
Award ceremony to be held on 3rd February, 2020
Special screenings to be held at Mumbai University, DeviprasadGoenka Management College and UshaPravin Gandhi College Campus at Vile Parle
16th MIFF witnesses a record 729 entries in National and 144 in International competition from 24 countries
The oldest international event for non-feature films in South Asia is getting off to a start tomorrow, providing a wonderful opportunity for film-lovers to be entertained and inspired by the finest documentary, short and animation films. Much awaited by cinephiles across India and the world, the 16th MIFF 2020 (Mumbai International Film Festival for Documentary, Short Fiction and Animation films), will be inaugurated on 28th January, 2020 at 5.00 pm at Nehru Centre Auditorium, Worli. The Chief Guest for the opening ceremony is Union Minister of State for Environment, Forest & Climate Change, Shri Babul Supriyo, while the Minister for Cultural Affairs & Medical Education, Government of Maharashtra, ShriAmitDeshmukh will be the Guest of Honour.
The coveted Dr. V Shantaram Lifetime Achievement Award will be declared and the award presented to the winning documentary film-maker at the opening ceremony. In every edition of MIFF, the coveted Dr. V Shantaram Lifetime Achievement Award, carrying a cash award of Rs. 10 lakh, trophy and a citation, is presented to a filmmaker for seminal contribution to documentary films and its movement in India.
The colourful opening ceremony will also include a cultural performance, organized by India Tourism.MIFF welcomes all with traditional folk dance of Maharashtra – the very graceful & vibrant ‘lavani’- presented by Harshada Jambekar & her team.This will be followed by “Nrutyarang” – a confluence of different Indian classical dance styles, where the various dance styles intermingle, echoing ‘Ek Bharat, Shresth Bharat’. This performance has been choreographed by Odissi exponent Smt. Shubhada Varadkar.
The opening films of the festival will be screened at the opening ceremony. The Russian animation film, “We Can’t Live Without Cosmos”from Konstantin Bronzit Retrospective, Jeremy Comte’s Canadian short fiction film “Fauve” from Oscar films package and Indian short documentary film “Rhyme and Rhythm of Loom” by Gautam Bora will open the 16th edition of MIFF.
The festival will conclude with an award ceremony at Nehru Centre Auditorium, Worli, on 3rd February at 5.00 p.m. Screening and other special events of the festival will be held at Films Division complex at 24, Dr. G. DeshmukhM arg, Mumbai from 29th January to 2nd February, 2020.
What makes MIFF 2020 Special
16th edition of MIFF will be special in many respects. Apart from screening of a wide variety of films in competition sections, departed legends of documentary and animation genres will be remembered with special screenings in homage section, apart from exhibitions on a few of them. Animation lovers will be delighted to savour retrospective packages from three countries and European documentary culture will be revealed through a specially curated package. The delegates of 16th MIFF will get to experience films drawn from a diverse canvas.
MIFF attracts film makers from all over the world. The number of entries received this year is testimony to the credibility of the festival. The 16th edition has received a record 729 entries in National and 144 in International competition from 24 countries, which underlines the remarkable response received by the festival.
MIFF 2020 will facilitate conversations, Q& A sessions and B2B meets between filmmakers and OTT players, to help filmmakers better market their films and to contribute to better understanding of the expectations of OTT players as regards documentaries, short films and animation films which can be hosted on the platforms.
A special award for the best short film on ‘Water Conservation and Climate Change’ carrying One lakh cash and trophy has been instituted in the current edition of the festival.
Highlights
The MIFF 2020 will have a number of attractions such as a special package of films from European Union, Animation package from Russia, Finland and Balkan, Oscar nominated films such as Fauve, Detainment and Night at the garden. Ireland will showcase its best documentaries in the Country Focus section.
Similarly, curated films from North-East India, best of various International Film Festivals and eminent film maker Satyajit Ray’s films such as Sukumar Ray, Rabindranath Tagore, The inner Eye, and iconic film Pikoo will be screened. Student films from FTII / SRFTI / NID / FTIT/ Srishti / Craft School/ Whistling wood add to the list of films eagerly awaited by delegates of MIFF. Other highlights include Open Forum by IDPA, ‘Film Editing’ workshop by B. Lenin, ‘Drone Cinematography’ Workshop by Indian Institute of Drones, Master classes by acclaimed animator Michael Dudok De Wit (Poland), senior film academician Thomas Waugh (Canada) and many more.
Added attractions in MIFF 2020 are Sculpture and Photo Exhibition-cum-demonstration to commemorate 150th Birth anniversary of Mahatma Gandhi and celebration of Centenary of Satyajit Ray. MIFF will pay homage to MrinalSen, Ram Mohan, Bhimsain Khurana, VG Samant, Vijaya Mule, Manjira Dattaetc by screening their select works and also through specially curated exhibition. This edition will also see a participation of intellectually challenged young adults with their short films, in special screenings. Further, films recommended by the Selection Committee will be screened under MIFF Prism.
A mobile app for MIFF has been launched, where festival delegates can access all information and updates on the festival. “MIFF 2020 is going mobile. All information on the festival can be accessed via the mobile app. The MIFF app will facilitate the delegates of MIFF to network and vote for films too”, stated Director General, Films Division, Ms. Smita Vats Sharma. The MIFF app can be downloaded here: onelink.to/miffindia.
The Festival Director further informed that Mumbai International Film Festival is a platform not only for Indian film makers but also for filmmakers from across the world. “MIFF not only recognises best talents in documentary, short fiction and animation films by bestowing Golden and Silver Conches and trophies, but it also gives away handsome cash awards in different competition categories. The most prestigious award in the 16th MIFF, the Best Film of the Festival carries a cash prize of 10 Lakh and Golden Conch while other awards carry cash awards varying from five to one Lakh along with Silver Conch, trophy and certificate. IDPA award carrying Rs.1 lakh and trophy for the Best student film and Dadasaheb Phalke Chitranagari Award for the Best Debut Director will also be presented on the closing day. Awards in various competition categories will be presented on 3rd February at the closing ceremony”, she added.
As part of MIFF 2020, screenings of specially curated films will be held at Kalina campus of University of Mumbai, Deviprasad Goenka Management College at Malad and UshaPravin Gandhi College Campus at Vile Parle to encourage and engage students at large to get involved in documentary film making and aesthetics. Legendary animation films will be screened at college campuses to attract younger audiences.
Apart from the mobile app, information on the festival can be accessed also at the festival website www.miff.in. The Festival Directorate can be approached at miffindia@gmail.com for queries related to the festival.
16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उद्या नेहरू सेंटर सभागृह, वरळी येथे होणार
मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार
पुरस्कार वितरण आणि सांगता समारंभ 3 फेब्रुवारी 2020 ला
महोत्सवादरम्यान मुंबई विद्यापीठ, देवीप्रसाद गोयंका व्यवस्थापन महाविद्यालय आणि पार्ल्याच्या उषा प्रविण गांधी महाविद्यालय परिसरात चित्रपटांचे विशेष शो
16 व्या मिफ्फसाठी राष्ट्रीय स्तरावर 729 तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 24 देशांमधून 144 प्रवेशिका
दक्षिण आशियातल्या माहितीपट आणि लघुपटांसाठीचा सर्वात जुना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ 2020 उद्यापासून सुरू होणार आहे. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या रसिकांना उत्तमोत्तम चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या संध्याकाळी 5 वाजता वरळीतल्या नेहरू सेंटर सभागृहात होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
प्रतिष्ठेचा डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात म्हणजे उद्याच जाहीर आणि वितरीत केला जाईल. प्रत्येक मिफ्फमध्ये हा पुरस्कार दिला जातो. 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. माहितीपट आणि लघुपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
उद्या होणाऱ्या आकर्षक सोहळ्यात भारतीय पर्यटन विभागाने आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. 16 व्या मिफ्फमध्ये चित्रपट रसिकांचे स्वागत महाराष्ट्राची पारंपरिक कला असलेल्या लावणीने केले जाईल. नृत्यांगणा हर्षदा जांभेकर आणि चमू लावणी सादर करतील. त्यानंतर भारतातल्या विविध शास्त्रीय नृत्य कलांचा संगम असलेला ‘नृत्यरंग’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना मांडली जाईल. सुप्रसिद्ध ओदिशी नृत्यांगना शुभदा वराडकर यांनी या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन रशियन ॲनिमेशन चित्रपट ‘वुई कान्ट लिव विदाऊट कॉसमॉस’ या कोस्टटॅटींन ब्रॉझिट यांच्या ॲनिमेशन पटाने होईल. त्याशिवाय ऑस्करसाठी नामांकन मिळालेला लघुपट ‘फॉव्ह’ आणि गौतम बोरा यांच्या ‘ऱ्हाईम ॲण्ड ऱ्हाईम ऑफ लूम’ हा माहितीपट देखील उद्घाटन सोहळ्यात दाखवला जाईल. महोत्सवाची सांगता आणि पुरस्कार वितरण समारंभ 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहात होईल. त्याशिवाय, या महोत्सवादरम्यान आणखी तीन ठिकाणी चित्रपट दाखवले जातील. चित्रपटांचे शो आणि महोत्सवातील इतर कार्यक्रम मुंबईतल्या डॉ. गणपतराव देशमुख मार्गावर असलेल्या फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होतील.
मिफ्फ 2020 ची वैशिष्ट्ये
मिफ्फ 2020 चाच भाग असलेल्या आणखी तीन ठिकाणी या महोत्सवादरम्यान चित्रपट दाखवले जात आहेत. त्यात एक, मुंबईत कालिना येथे असलेल्या विद्यापीठ परिसर, मालाडचे देबिप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज आणि पार्ल्याच्या उषा प्रवीण गांधी कॉलेज मधेही काही चित्रपट दाखवले जाणार आहेत. माहितीपट आणि लघुपट क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.
सोळावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ 2020 अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरणार आहे. स्पर्धा विभागातल्या विविध विषयांवरील चित्रपटांच्या प्रदर्शनासह, माहितीपट आणि ॲनिमेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ दिवंगत दिग्गजांच्या सन्मानार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटाचे विशेष शो आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. “रेट्रोस्पेक्टीव्ह पॅकेजेस’ या विभागात अॅनिमेशनपटांच्या चाहत्यांना तीन देशातील जुन्या निवडक ॲनिमेशनपटांचा आनंद घेता येणार आहे. तसेच, आणखी एका विशेष पॅकेजमधून युरोपीय माहितीपटांची संस्कृती उलगडली जाणार आहे. सोळाव्या मिफ्फसाठी जगभरातून येणाऱ्या प्रतिनिधींना विविध विषयावरील माहितीपट आणि लघुपटांचा आनंद घेता येणार आहे.
मिफ्फ हा जगभरातील माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांना आकर्षित करणारा महोत्सव आहे. यंदाही या महोत्सवासाठी आलेल्या प्रवेशिकांची संख्या पाहिली असता, या महोत्सवाला मिळालेली लोकप्रियता आणि विश्वासार्हता याचा अंदाज येऊ शकेल. या महोत्सवासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 729 चित्रपट तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 देशांतून 144 चित्रपट प्रवेशिका आल्या आहेत.
मिफ्फ 2020 मध्ये चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांमध्ये प्रश्नोत्तराची सत्रं असणार आहेत. त्यातून माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पटांच्या निर्मितीमागची निर्माते आणि दिग्दर्शकांची भूमिका समजून घेता येईल. यावर्षीपासून या महोत्सवात “जल संवर्धन आणि हवामानबदल” या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी एक नवा पुरस्कार दिला जाणार असून एक लाख रुपये रोख आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
ठळक वैशिष्ट्ये:-
मिफ्फ 2020 मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात युरोपीय महासंघातील चित्रपटांसाठी विशेष पॅकेज, फिनलँड, बाल्कन आणि रशियातील अॅनिमेशनपटांचे पॅकेज, ‘फॉव्ह’, ‘डिटेन्मेंट’, ‘नाईट ॲट द गार्डन’ असे ऑस्कर पुरस्कार नामांकित चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत. ‘कंट्री फोकस’ विभागात आयर्लंडचे सर्वोत्कृष्ट माहितीपट दाखवले जाणार आहेत.
त्याशिवाय, ईशान्य भारतातील निवडक माहितीपट-लघुपट, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेले चित्रपट, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे चित्रपट, ‘सुकुमार रे’, ‘रबिन्द्रनाथ टागोर’, ‘द इनर आय’ आणि सुप्रसिद्ध चित्रपट ‘पिकू’ देखील दाखवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट विभागात, एफटीआयआय/ एसआरएफटीआय/ एनआयडी/एफटीआयटी/ सृष्टी/क्राफ्ट स्कूल/विसालिंग वूड अशा विविध चित्रपटनिर्मिती प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट दाखवले जातील. इतर वैशिष्ट्यांमध्ये, आयडीपीए द्वारे आयोजित मुक्त व्यासपीठ, “चित्रपट संकलन(फिल्म एडिटिंग) विषयावर बी लेनिन यांची कार्यशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ड्रोन्स द्वारे “ड्रोन सिनेमॅटोग्राफी’ या विषयावरील कार्यशाळा, पोलंडचे सुप्रसिद्ध अॅनिमेटर मायकेल डूडो दे विट, कॅनडाचे चित्रपट समीक्षक थॉमस व्हॉ आणि इतर मान्यवरांचे मास्टर क्लासेस होणार आहेत.
त्याशिवाय, महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त तसेच सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून एक विशेष मूर्ती आणि चित्रप्रदर्शन देखील या महोत्सवात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासोबतच, मृणाल सेन, राम मोहन, भीमसेन खुराना, व्ही जी सामंत, विजया मुळ्ये, मंजिरा दत्ता या दिग्गज कलाकारांना आदरांजली म्हणून त्यांच्या निवडक कलाकृती या महोत्सवात दाखवल्या जाणार आहेत. आणखी एक विशेष म्हणजे या महोत्सवात काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपट विशेष विभागात दाखवले जाणार आहेत.
चित्रपटाच्या उत्तम मार्केटींगसाठी चित्रपट निर्माते आणि ओटीटी प्लेअर्स यांच्यात बैठका आणि सुसंवाद घडवून आणण्यासाठी मिफ्फ 2020 उत्तम मंच ठरेल असे मतही महोत्सव संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी व्यक्त केले. मिफ्फ संदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मिफ्फ संचालकांच्या हस्ते डेलिगेटसाठीच्या मिफ्फ ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. या ॲपद्वारे डेलिगेट्स चित्रपटांसाठी आपले मतही नोंदवू शकणार आहेत. मिफ्फ ॲपची लिंक पुढीलप्रमाणे:- http://onelink.to/miffindia
सर्व नोंदणीकृत डेलिगेट्सना परस्परांशी संवाद साधण्यासाठी ॲपमध्ये स्वत:ची व्यवस्था आहे. खालील QR कोडद्वारेही हे ॲप डाऊनलोड करता येईल.
मिफ्फमध्ये माहितीपट, लघुपट आणि अनिमेशनपाटांच्या क्षेत्रातील दर्जेदार कलाकृतींचा सुवर्ण आणि रौप्य शंख देऊन गौरव तर केला जातोच; त्याशिवाय, विविध स्पर्धा विभागातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसेही दिली जातात. 16 व्या मिफ्फ मधील सर्वोकृष्ट चित्रपटाच्या मानाच्या पुरस्काराचे स्वरुप सुवर्णशंख आणि 10 लाख रुपये असे आहे. तर इतर पुरस्कारांमध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार, रौप्यशंख आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. पदार्पणातील दिग्दर्शनासाठीचा ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार’ देखील समारोपाच्या दिवशी दिला जाईल, अशी माहिती महोत्सवाच्या संचालिका आणि फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा यांनी दिली.
मोबाईल ॲप व्यतिरिक्त, डेलिगेट नोंदणी आणि इतर सविस्तर माहितीसाठी www.miff.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा miffindia@gmail.com या मेलआयडीवर संपर्क साधावा..
S.Tupe/R.Aghor/P.Kor